Description

गेल्या दहा-पंधरा वर्षे मी जे काही सार्वजनिक कार्य करीत आहे त्याचा उगम महाडातच झाला आहे. येथेच मला स्फूर्ती मिळाली व या शहरात माझ्या कार्यात मला सहकारी मिळाले. ते मिळाले नसते तर माझे कार्य यशस्वी झाले नसते. मागे आम्ही चवदार पाण्याच्या तळ्यासाठी दंगा केला. पण तो विसरून महाडकर मला लोभाने वागवतात, हे विशेष होय. माझे कार्य दिसायला जातीवाचक असले तरी ते खरे राष्ट्रीय आहे. देशातील सर्व लोक संघटीत होऊन एक राष्ट्र निर्माण व्हावे ही माझी संदिच्छा आपण ओळखली आहे हे आजच्या मानपत्राने सिद्ध झाले आहे.