Description

यमुनाबाई वाईकर… लोककलेच्या… लावणीच्या बहुढंगी क्षेत्रातलं एक लखलखीत व्यक्तिमत्व… लावणीला घरंदाजपण देणारं… प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं… स्वतःची वेगळी मुद्रा निर्माण करणारं. गुरं राखत, लोकांकडे मागून खात जगणाऱ्या कुटुंबातली एक मुलगी जन्मजात लाभलेल्या गळ्याच्या जोरावर अथक मेहनतीनं… जिद्दीनं… आणि श्रद्धेनं उभी राहिली… देश-विदेशात मानाचं पान मिळविणारी ठरली… या साऱ्या विलक्षण प्रवासाची ही कहाणी. लोककलावंतांच्या जीवनाचा आत्मियतेनं अभ्यास करणारे प्रभाकर ओव्हाळ यांनी चितारलेली… चित्रमय … रसरशीत … लय-सूर-ताल यांनी नटलेली…