Availability: In Stock

Loksahitya Abhyasachya Navya Disha | लोकसाहित्य अभ्यासाच्या नव्या दिशा

420.00

ISBN :- 9788119258963

Publication Date :- 28/06/2024

Pages :- 239

Language :- Marathi

Description

मानवी जीवनाचा समग्र वेध घेताना केवळ भूतकाळातील मृत अवशेषांचे पुरावे एका मर्यादपर्यंतच उपयोगी पडतात. ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, नाणी यांतून फार तर तत्कालीन राज्यकर्त्या वर्गाची माहिती मिळू शकते. पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेल्या साधनांचाही एका मर्यादपर्यंतच उपयोग होऊ शकतो. पण लोककथा, लोकगीते, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे (आणि शिव्यासुद्धा) हे शाब्द साहित्य सामान्यातील सामान्य माणसाच्या मनातील भावनांची, विचारांची, धारणांची सूक्ष्मातिसूक्ष्म आंदोलने जतन करीत असते. बदलत्या भौतिक जीवनातील पडसादही या शाब्द लोकसाहित्यात अगदी सहजपणे उमटलेले दिसतात. त्यामुळे शाब्द लोकसाहित्य लोकजीवनाचा, लोकमानसाचा समाजशास्त्रीय अभ्यास करण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरते. (प्रस्तावनेतून साभार…) – डॉ. तारा भवाळकर

साहित्याच्या अभ्यासामध्ये संस्कृतीच्या गौरवीकरणाची एक दृष्टी आपल्याकडे अस्तित्त्वात आलेली दिसते. खरं तर नव्या अभ्यासकांनी या सगळ्यासंबंधी वेगळा विचार करायला पाहिजे. यमुनाबाई वाईकरांचा गौरव केला जातो. विठाबाई नारायणगावकर यांचाही गौरव केला जातो. यांचा उल्लेख गौरवाने केला जातो. मात्र विठाबाई मांग असते. यमुनाबाई कोल्हाटीन असते. ही गोष्ट इथं विसरली जात नाही. आपल्याकडे सगळ्या कला या कुठल्यातरी जातीशी निगडीत आहेत आणि या सगळ्या जाती शूद्र जाती आहेत. शूद्र जातींनी निर्माण केलेल्या कलांचा नाहक गौरव करणारे लोक आहेत. कलांचा गौरव होतो पण कलावंतांचं काय? (उद्घाटनपर भाषणातून साभार…) – डॉ. विश्वनाथ शिंदे

मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासात जो ‘तोच तो पणा’ आलेला आहे, तसेच गौरवीकरणातून प्रस्थापित व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्यापेक्षा लोकसाहित्याचा विचार करता यावा म्हणून काही नव्या बाबी सुचविलेल्या आहेत. अभ्यासकांना त्यांचा उपयोग झाल्यास मला आनंद होईल. शेवटी कोणत्याही प्रबंध लेखकास, संशोधकास मी एवढेच सांगेन की, संशोधक हा चिकित्सक असतो. भक्त असत नाही. मराठीच्या संशोधनाला, अभ्यासाला या भक्तिभावाने शबलित केलेले आहे, हे येथे मुद्दाम सांगावेसे वाटते. (बीजभाषणातून साभार…) – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

Additional information

Book Editor

Dr. Navnath Shinde | डॉ. नवनाथ शिंदे, Jyotsna Khandagale | ज्योत्स्ना खंडागळे, Siddharth Lande | सिद्धार्थ लांडे