Availability: In Stock

Mantharak Ani Itar Ekankika | मंथरक आणि इतर एकांकिका

90.00

Publication Date: 01/12/2003

Pages: 96

Language: Marathi

Description

साठ-सत्तरच्या दशकात जन्मलेल्या आणि नव्वदीच्या दशकात लिहू लागलेल्या पिढीतील तरुण साहित्यिकांच्या जाणिवा नेमक्या काय आहेत, याचा शोध घेतला तर वर्तमान परिस्थितीचे एक चित्र आपल्यापुढे निश्चितपणे उभं राहू शकेल. नाटकामध्ये शफाअत खान, संजय पवार, जयंत पवार, प्रशांत दळवी यांसारखे प्रयोगशील नाट्यलेखक आपणाला दिसतात. याच पिढीच्या समकालीन लेखन करणारे जयसिंग पाटील हे कोल्हापुरातील एक नाव. विविध स्पर्धांतून दखलपात्र ठरलेल्या पाच एकांकिकांचा हा संग्रह त्यांच्या लेखनक्षमतेची जाणीव करुन देतो. महानगर होत निघालेलं शहर आणि शहर होत निघालेलं गाव यांच्यामध्ये हेलकावणाऱ्या अस्वस्थ तरुणाचे अनुभवविश्व ते नाट्यमाध्यमातून पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नाट्यतंत्राचं नेमकं भान या लेखकाला आहे; पण तो तंत्राच्या शरण गेलेला नाही. अनुभवाचं सत्व तो कुठेही हरवू देत नाही. त्याचं कारण त्यानं हे कदाचित स्पर्धेसाठी म्हणून लिहिलेलं नाही हे असावं. महाराष्ट्रात अनेक शहरातून, गावांतून एकांकिका स्पर्धा होत असतात. त्यांना नवीन असं काहीतरी करायला हवं असतं. या एकांकिका त्यादृष्टीने आव्हानात्मक ठरू शकतील.मात्र पाटील यांचा अनुभवांचा प्रदेश एकच असला तरी संग्रहातील ‘मंथरक’, ‘त्रिकोणाच्या मध्यावर’, ‘गणनायक’, ‘आदिप्रतिमा’, ‘फ्रीडमफायटर्स’ अशी प्रत्येक एकांकिका वेगळ्या प्रतीचा अनुभव देऊन जाते. घटना नसल्या तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे नाट्य, संवादातला सहजपणा, तिरकस विनोद ही त्यांच्या लेखनातील आणखी काही बलस्थाने आहेत.पाटील यांचा लेखनविस्तार एकांकिकेकडून नाटकाकडे झाला आहे. ते आवश्यकही होते. ‘वेड्या कुंभाराचं काय झालं ?’, ‘परकायाप्रवेशाचा वग’ अशा दोन नाटकांचे लेखन त्यांनी अलीकडे केले आहे. त्यातूनही ते दणकटपणे व्यक्त होताना दिसतात. म्हणूनच त्यांच्या लेखनावर आपण लक्ष ठेवायला हवे !

Additional information

Book Author