Description
विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सुभाष भेंडे, उत्तम कांबळे, भास्कर चंदनशिव, सदानंद देशमुख याबरोबरच इतर अनेक लेखकांच्या कलाकृतींचे नवे आकलन प्रस्तुत ग्रंथात प्रा. विश्वनाथ शिंदे यांनी मांडलेले असून कथा, कादंबरी, नाटक, आत्मकथा या वाङ्मय- प्रकारातील निवडक कलाकृतींचे विवेचन या ग्रंथात आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून प्रा. शिंदे यांना आपण ओळखत असलो तरी त्यांनी आधुनिक साहित्याविषयीदेखील विपुल लेखन केले आहे. विशेषतः लोकसाहित्य आणि लिखित साहित्य यातील वाङ्मयीन आणि सांस्कृतिक अनुबंध उलगडून सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथात दिसतो. डॉ. मधुकर वाकोडे यांचा अपवाद वगळता असा अनुबंध उकलून सांगण्याचा प्रयत्न मराठीत फारसा झालेला नाही. या दृष्टीने केलेले वेगळे विवेचन प्रस्तुत ग्रंथात असल्याने हे पुस्तक महत्त्वाचे आहे.