Description
“साहित्य हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असते. अशा साहित्यात प्रगट होणारा जीवनाशय, त्याची आविष्कारपद्धती ह्या सर्वांना एक संदर्भ असतो. साहित्य प्रकाराची स्वतःची अशी एक परिवर्तनशील संकेतव्यवस्था असते. त्यानुसार त्याचे आकलन करणे गरजेचे असते. साहित्याचा अभ्यास करताना वाङ्मयप्रकाराचा आधी शोध घ्यावा लागतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने साहित्याची मांडणी करता येते. डॉ. द. के. गंधारे यांनी ‘मराठी वाङ्मय प्रकार : स्वरूप, संकल्पना व वाटचाल’ ह्या ग्रंथाची निर्मिती करून अभ्यासकांना एक प्रेरणा दिली आहे. एकूण २३ लेखकांचे लेख ह्यात समाविष्ट असून त्याद्वारे साहित्यप्रकारांची सखोल मांडणी करण्यात आलेली आहे.
माझे एके काळचे विद्यार्थी डॉ. गंधारे हे २००३ पासून सातत्याने लेखन करत आहेत. त्यांचा हा सातवा ग्रंथ अभ्यासकांना मोलाचा ठरेल, असा मला विश्वास वाटतो. वाङ्मय प्रकाराची एकत्रित मांडणी करणारा डॉ. गंधारे यांचा ग्रंथ साकारत आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!”