Description
तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीवर असलेल्या एकूण वनांपैकी ८०% वने नाहीशी झाली आहेत. सस्तन प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी एक चतुर्थांश प्रजाती नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हे भयकारक नाहीये का की दहा लाखांपेक्षा जास्त समुद्रीपक्षी आणि एक लाखापेक्षा जास्त समुद्रीजीव हे दरवर्षी प्रदुषणामुळे मारले जातात. निसर्ग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याला वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. ‘निसर्गाचे संवर्धन का करावे?’ हे पुस्तक निसर्गाबद्दलची आस्था वाढविण्यासाठी तसेच आपल्या भोवतालच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करते. जागतिक तापमानवाढ, वातावरणातील बदल याविषयी सोप्या शब्दात तुम्हाला समजावते. डोळे उघडणारे वास्तव, सुंदर आणि रंगीत चित्रे आणि निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा वेगवेगळ्या पद्धतीने सराव, या सर्व गोष्टींची या पुस्तकात रेलचेल आहे. निसर्गाच्या संवर्धनात तुमचा वाटा उचलण्यासाठी हे पुस्तक योग्य मार्गदर्शक आहे.