Description

मराठी कविता शेतकऱ्यांच्या शेतमळ्यातून, श्रमिकांच्या श्रमाची गाणी गाते. दलितांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या घामातून वाटचाल करते, त्यांच्या हर्ष मर्षाची नोंद घेते. निसर्गातील निर्झरातून, पाटपाण्यातून, डोंगरदऱ्यातून, झाडामाडातून, वेलींतून मुक्तपणे विहरते. स्त्री जन्माच्या व्यथा वेदनांमध्ये रमते आणि तिच्या जगण्याच्या वेणाही सहन करते. आणि सुंदर जीवनाचे स्वप्न पाहते. बालगोपाळांच्या बोबड्या निरागस बोलांना त्यांच्याच नाद लयींमधून साकार करते. वृद्धांच्या, विधवांच्या डोळ्यांतील असहाय्यता, कारुण्य यांचा अर्थ सांगते. परित्यक्तांच्या जीवनात त्यांना आधार देते. समुद्राच्या गाजेप्रमाणे मानवी जीवनात रात्रंदिवस गस्त घालते अन् जागल्याचे काम करते. अपंग असहाय्यांच्या व्यथा वेदना सर्व सहृदयापर्यंत पोहचवते. वाचकांच्या अंतर्मनात खोल खोल सल निर्माण करून संस्कार करते. मानवी जीवनाचा अर्थ सांगून मानवी जीवनात विविध भावनांचे तरंग निर्माण करते.

Additional information

Book Editor

Pra.Dr.Vasant Shekade | प्रा.डॉ.वसंत शेकडे