Description
मराठी कथेचा प्रवास विविध रंगी, विविध ढंगी असा आहे. ती कधी अद्भुतात, कल्पनारम्यतेत रमली, कधी समाजजीवन रेखाटण्यात दंग झाली, कधी तंत्राच्या चौकटीत बंदिस्त झाली तर कधी मनोविश्लेषणात हरवली. कधी ग्रामीण जीवनाचा वेध तिने घेतला. स्त्रीजीवन, स्त्रीसमस्या तर ती सतत सांगत राहिली. कधी बालांसाठी, कधी वृद्धांसाठी तर कधी दलित वेदना सांगण्यासाठी अवतरत राहिली. विज्ञानाचे, गूढतेचेही तिला वावडे नाही. गुप्तहेरांच्या कथाही तिने मराठी रसिकाला सांगितल्या. मराठी मन, मराठी समाज जसजसा बदलत गेला त्या सगळ्या बदलांना तिने आपल्यात सामावून घेतले.