Description

गोपाळराव सोले पाटील हे माझे फार जुने स्नेही. राजकारण, समाजकारण आणि साहित्यकारण यामुळे त्यांच्याशी नेहमीच संबंध येत असे. त्यांची कन्या सौ. निर्मलाताई काळे यांच्या कविता माझ्यासमोर आल्या. मला आश्चर्य तर वाटलेच पण आनंदही झाला. कवितासंग्रहाच्या नावातच निर्मलाताईंनी त्यांच्या आईचे आणि वडिलांचे नाव गुंफले आहे. पद्मगोपाळ ! यातूनच त्यांच्या आई-वडिलांविषयीचा जिव्हाळा आणि कृतज्ञता प्रत्ययाला येते. अध्यात्म, आयुष्य, प्रेम, निसर्ग, कुटुंब अशा अनेक गोष्टींविषयी सौ. निर्मलाताईंनी आपल्या कवितेतून वाचकांशी संवाद केला आहे. निरागस आणि निर्मळ अश्या ह्या कविता वाचकांना नक्कीच आनंद देतील. अरणगावच्या मातीतून उमलून आलेल्या या कवितेला आणि तिची निर्मिती करणाऱ्या सौ. निर्मलाताई काळे यांना मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. त्यांनी उदंड कविता लिहाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करतो.