Description

काही माणसं जन्मतः मोठेपण घेऊन येतात. काही माणसांवर मोठेपण लादलं जातं तर काही माणसं स्वतःच्या प्रयत्नांनी मोठी होतात. नामदेवराव स्वकर्तृत्वाने, स्वप्रयत्नाने मोठे झालेले आहेत. पंचनामा कथासंग्रह हे माझ्या मित्राच्या कर्तृत्वाचं दृश्य रूप. या संग्रहातल्या १३ कथा ह्या आजूबाजूच्या डोळस निरीक्षणातून साकारलेलं वेगळं जग आहे. माणसा-माणसांतल्या वेगवेगळ्या भल्या-बुर्‍या-वृत्ती-प्रवृत्ती येथे दिसतात. त्यांना खंत जरूर आहे. पण ती व्यक्त करताना ते कुठेही कडवटपणा येऊ देत नाहीत. हसत हसत सामाजिक व्यंगावर नामदेवराव नेमके बोट ठेवतात. खडा तर मारायचा पण तो अशा चातुर्यानं की, तो लागायचाच, पण लागून रक्त नाही निघणार. नामदेवरावांची कथा सहाकरातल्या विकृतींवर नेमके बोट ठेवते. त्यापाठीमागे त्यांचे मन सहकाराचा विशुद्ध गाभा निकोप रहावा यासाठी धडपडताना दिसते.