Description
अलीकडे मराठी काव्यविश्वात ग्रामीण कवी आपल्या संवेदना अत्यंत समर्थपणे शब्दबद्ध करीत आहेत. यात कोपरगावचे कवी ‘प्रा. संजीव दुधाट’ हे स्वानुभवातून नाविन्यपूर्ण अशा कविता लिहीत आहेत. व्यवसायाने ते जरी अभियंता महाविद्यालयात प्राध्यापक असले तरी, सभोवतालच्या सामाजिक आणि नैसर्गिक अनुभवांचा उत्कृष्ट व उत्कट आविष्कार त्यांनी आपल्या कवितांमध्ये अत्यंत हळुवारपणे टिपला आहे. त्या दृष्टीने त्यांचा ‘पाऊलखुणा’ हा काव्यसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पाऊलखुणा’ हा कवितासंग्रह अनुभवाच्या विविधतेवर आधारित असून या कवितेत कवीला आपले अनुभव अभिव्यक्त करण्यास सूर सापडला आहे असे वाटते. वाचक या काव्यसंग्रहाचे स्वागत करतील यात संदेह नाही.- प्रा. रायभान दवंगे