Availability: In Stock

Rahile Door Ghar Majhe | राहिले दूर घर माझे

100.00

Publication Date: 01/09/2011

Pages: 79

Language: Marathi

Description

वैचारिक नाटकांपेक्षा या नाटकाचे यश फार मोठे आहे. ‘मराठीमधे चांगली नाटके नाहीत.’ असा टाहो फोडणाऱ्यांनी, ‘जागतिक रंगभूमी कुठच्या कुठे गेली आहे’, अशी हाकाटी करणाऱ्यांनी, ‘राहिले दूर घर माझे’ सारख्या नाटकांचा जरुर विचार करावा.- रत्नाकर मतकरी. (महाराष्ट्र टाईम्स) दादीचा एकांत कुणाचीच पडझड होऊ देत नाही. या एकांतात मन:शांती आहे, निवृत्ती आहे आणि निरोपही आहे. पण त्या निरोपाच्या वेळी स्वत:च्या वृत्तीच्या सगळ्या वेली दादीने तन्नोच्या आयुष्यात रुजवलेल्या असतात. साखळी तुटत नाही… दुवे जुळत जातात आणि जीवनाला निर्भयपणे, निर्धाराने, प्रतिष्ठेने पुढे नेतात. – विजया राजाध्यक्ष. (लोकसत्ता) धर्मांध क्रौर्याविरुद्ध सामान्य माणसानेच उभे राहिले पाहिजे. मानवी आत्मभानाने आणि आत्मबळाने आपण त्याच्या विरुद्ध ठामपणे उभे राहिलो तर त्या धर्मांधतेचा पराभव अटळ असतो आणि मानवी आत्मभानाशी संवादी नातेबंध माणसामाणसांमध्ये निर्माण होत असतो. हेच तर माणसाला हवे असते आणि हाच संस्कार, हीच समज हे नाटक देत राहते.- एम. पी. पाटील. (अनुष्टुभ् ९७ ) प्रेक्षकांना मुळापासून हलवण्याचं सामर्थ्य या नाटकात आहे. स्वत: ला हिंदू आणि मुसलमान म्हणवणाऱ्या प्रत्येकाने हे नाटक आवर्जून बघायला हवं.- निखिल वागळे (महानगर)

Additional information

Book Author