Description
सुखदेव ढाणकेची कविता आता ‘असुवनजल सींच सींच प्रेमबेल बोई’ अशी फुलारून अभंग ओवीतून सारे ताण ओलांडून संतजाणिवेला मिठी घालू शकली आहे. आण घालणे या क्रियेत सोसणे आहे, जगणे आहे आणि भरजरून येणेही आहे हे या कवितेने ओळखले आहे. म्हणूनच ही लहानशी कविता मला पार बोधिवृक्षाच्या सावलीत घेऊन जाते. घनघोर पावसासारखी ती जाणीव माझ्यावर चालून येते आणि मला अनावर ओढीने फुसांडत ओढणाऱ्या पाण्यासारखे दुःखाच्या पैलतीरावर घेऊन जात माझ्या आत प्रेमाचा प्रकाश पहाटवत राहते. हे या कवितेचे बळ माझ्या ओंजळीत मावत नाही पण ते वाळूसारखे सुटून जाऊ नये म्हणून मी उराशी धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत राहते आणि करीत राहीन !