Description

युगंधरच्या नाटकात पात्रं बोलत नाहीत, ते बरळतात, ही भावनाहीन बडबड अस्वस्थ करणारी आहे.
आता माणसांचं यंत्रात रूपांतर झालं आहे. ही नाटकं वाचताना, ‘हे माणसांचं नाटक नाही, हे माणसासारख्या दिसणाऱ्या मशीन्सचं नाटक आहे’, अशी टोचणारी जाणीव सतत होत राहते. युगंधरला आजचा ‘यंत्र मानव’ नेमका कळला आहे. त्यांचं जगणं नाटकात पकडणंही जमून गेलं आहे. त्याच्या नाटकात गाव आहे, घर आहे आणि कुटुंबही आहे. पण तो नाटकात कुटुंबाची गोष्ट सांगत नाही. कुटुंबांच्या गोष्टी दाखवण्यासाठी नाटकं रचत नाही.
गोष्ट असण्या-नसण्याच्या मध्ये त्याचं नाटक दडलेलं आहे. तो सलग गोष्ट सांगत नाही. तो काही तुकडे उलट, सुलट करून माणसांचं आणि नात्यांचं उत्खनन करत जातो.
शफाअत खान















Reviews
There are no reviews yet.