Description
आपल्या आजीच्या ओव्यांचं, गाण्यांचं, कवितांचं संपादन करताना सौ. प्राजक्ता शित्रे यांनी आजीनं दिलेल्या सांस्कृतिक ठेव्यातून अंशतः ऋणमुक्त होण्याची भावना ठेवली आहे. त्यांनी परिश्रमपूर्वक काम केलं आहे. त्या निमित्तानं नगर जिल्ह्याचा इतिहास, इथली भाषा, सहकारी चळवळ याविषयी त्यांनी केलेला अभ्यास; त्यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेत त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. नगरी बोलीतील शब्दांचा प्रमाण भाषेतला अर्थ सांगणारा छोटेखानी कोश अखेरीस देऊन वाचकांना वाचताना रसविघ्न निर्माण होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली
आहे.