Description
साहित्यप्रकारामधील कथनपर साहित्य व नाट्य हे साहित्यप्रकार अधिकाधिक लोकप्रिय आहेत. वेगवेगळ्या कालखंडात विविध विचारवंतांनी, या साहित्यप्रकारांच्या स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. सतीश कामत यांनी अतिशय मेहनतीने संपादित केलेल्या प्रस्तुत ग्रंथात महाराष्ट्रभरातील नवीन पिढीच्या विचारवंत, प्राध्यापकांनी कादंबरी, आत्मकथन, नाटक या रसिकप्रिय साहित्यप्रकारांच्या स्वरूपाचा वेध घेतला आहे. ‘थँक्य यू मिस्टर ग्लाड’, ‘दिवे गेलेले दिवस’ या ‘मराठीतील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महत्त्वाच्या कादंबऱ्या व ‘मन मे है विश्वास’, ‘जसं घडलं तसं’ ही आत्मकथने तसेच ‘चाकरमानी’ या मालवणी नाटकाची विशेष संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. साहित्याच्या अभ्यासकांसाठी ‘साहित्य: आशय आणि आविष्कार’ हा एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.