Description
कोणतीही चांगली साहित्यकृती ही मुख्यतः एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी ती जगण्यातून आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणातून निष्पन्न होत असते. अशा निर्मितीसाठी भाषा या माध्यमाचा अवलंब करतानाच तो समाज आणि संस्कृती यांच्याशी जोडली जाते. या माध्यमातून सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे चित्रण केले जाताना वस्तूरुप जगाचा कायापालट अवस्तूरूप अशा प्रतिकात्मक जगात होत जातो आणि ते नव्यानेच संघटित केले जाते. त्यामुळे घडते असे की, हे नवे जग वस्तुरुप नसूनही वास्तव असल्याचे आणि अवस्तुरुप असूनही अवास्तव नसल्याचे प्रतीत होत राहते.
प्रस्तुत लेखन साहित्याच्या सामाजिक व सांस्कृतिक संबंधांचा विचार करताना साहित्यकलेच्या या स्वरूपाचे भान सतत बाळगताना आढळते.