Description
साहित्याची निर्मिती एखाद्या पोकळीत नक्कीच होत नाही. भावना, संवेदना, जाणीव, अनुभव अशा अनेक घटकांची एकत्रित गुंफन होऊन साहित्य साकारते. संवेदनशील मनाच्या व्यक्ती अनुभवांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. त्यांच्या मनात अनेकविध स्वरूपाचे हुंकार उमटतात. हेच हुंकार मग साहित्यरूप धारण करतात. मग या साहित्याचे स्वरूप उलघडताना साहित्यविचार आणि समीक्षाव्यवहार महत्त्वाचा ठरतो. साहित्यकृतीचा विचार करताना अभ्यासकाला तत्कालीन परिस्थितीचाही विचार करावा लागतो. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजनैतिक आदि बाबींचा विचार अभ्यासक करत असतो. ‘साहित्यगंध’ या ग्रंथातील लेखातही हीच भूमिका ठळकपणे मांडलेली दिसून येते. प्रस्तुत ग्रंथात एकूण ११ लेख समाविष्ट केलेले आहेत. त्यापैकी काही लेख साहित्याचे प्रवाह आणि प्रकार यांची चर्चा करणारे आहेत. तर काही मराठीतील महत्त्वाच्या साहित्यकृतीवर भाष्य करणारे आहेत. त्यातून आशय व भाषेच्या अंगाने अभ्यासकांनी विवेचन केलेले आहे