Description
विविध विषयांवर लेखन करीत राहणे हे जसे महत्त्वाचे असते तसेच त्या लेखनाला आपल्या अभ्यासक्षेत्राच्या अनुषंगाने काही निश्चित केंद्रे देणे हेही महत्त्वाचे असते, या गोष्टीची भारती निरगुडकर यांना जाण आहे. त्यामुळे साहित्यसमीक्षा-विशेषतः स्त्रीवादी समीक्षा, कथनमीमांसा, समाजशास्त्रीय समीक्षा, कथा ही केंद्रे त्यांनी लेखनासाठी विशेषत्त्वाने निवडलेली दिसतात. त्यांचे लेखन चोख, नेमके व अवघड विषयही सुगम शैलीत मांडणारे असते. विश्वासार्हता (credibility) हा एक दुर्मिळ गुण यां लेखनातून दृष्टोत्पत्तीस येतो.
‘ढिसाळ विस्कळित समीक्षा उदंड असते; परंतु भारती निरगुडकर लिहितात त्याप्रकारची अभ्यासूपर्ण, सूत्रबध्द समीक्षा दुर्मिळ असते.