Availability: In Stock

Saptarangi Ekankika | सप्तरंगी एकांकिका

120.00

ISBN: 9789380617497

Publication Date: 01/06/2013

Pages: 112

Language: Marathi

Description

जन्माला येणाऱ्या बालकावर उत्तम संस्कार घडवून त्याला सुजाण नागरिक बनवणं हे समाज व्यवस्थेचं उत्तम लक्षण आहे. बालकावर संस्कार घडवण्याचे काम हे कुटुंबात, शाळेत आणि समाज व्यवस्थेत होत असते. या घटकांकडून बालकाला काय मिळाले यावर त्याचं माणूस बनणं अवलंबून असतं. कुटुंब आणि समाज यांच्याकडून निसर्गतः नकळत बालकावर संस्कार घडत असतात, परंतु शाळेत जाणिवपूर्वक संस्कार घडवले जातात. शाळेत वेगवेगळ्या उपक्रमांमधून मुलांना अनुभव देण्याचा प्रयत्न होत असतो. त्यातून मुलं अनेक गोष्टी शिकत असतात. त्यांना चांगल्या-वाईटाची जाण येत असते. शालेय स्तरावर मुलांना नाटिकांमधून, एकांकिकांमधून भूमिका करायला मिळाल्या तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडून येवू शकतो कारण मुलं भिन्न अशा व्यक्तिरेखांशी समरस होवून अभिनय करत असतात. नाटिका, एकांकिका यातील इतर व्यक्तिरेखांचं निरीक्षण ते करतात. या सर्व बाबी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून येण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो. संस्कार होतात आणि सुजाण नागरिक घडण्याला दिशा मिळते.

श्री. दयाराम गिलाणकर यांनी लिहिलेल्या ‘सप्तरंगी एकांकिका’ या संग्रहातील सातही एकांकिका देशप्रेम, शिक्षण, सद्वर्तनाचे महत्त्व, वृध्दांबद्दलचा आदर, मानवता, सामाजिक बांधिलकी असे विविध प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर व विचारप्रक्रियेवर करण्यात यशस्वी झालेल्या आहेत.