Description

जगातल्या पहिल्या सात-आठ भाषिक समूहांपैकी एक आपण आहोत. एका अतिशय सशक्त अशा सांस्कृतिक व भाषिक परंपरेचे संचित आपल्यापाशी आहे. आपल्यामध्ये सत्त्व आहेच. ते प्रकट केले जाण्याची पूर्वपरंपरा आहे. आज त्याचे भान येणे ही गरज झाली आहे. नव्या वर्तमानाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने व त्याच्या संदर्भात ते यायला हवे. म्हणून मी ही ‘सत्त्वाची भाषा’ -करीत आहे. अशी भाषा करण्याची खुमखुमी ज्याअर्थी गेल्या एवढ्या वर्षांपासून माझ्या ठायी आहे व आज ती आणखी जोरकस झालेली आहे. त्याअर्थी तिला काही एक महत्त्व खासच असले पाहिजे असे मला वाटते. इतरांना ते वाटावे अशी इच्छा अर्थातच आहे. किंबहुना त्यासाठीच मी हा ‘सांस्कृतिक सत्त्वाचा प्रस्ताव’ मांडत आहे.

Additional information

Book Author