Description
‘सांस्कृतिक समन्वय’ या विषयावरील विशेष लेख असलेला यंदाचा हा अंक घेऊन आलो आहोत.
‘संस्कृती’ हा शब्द अलिकडे सातत्याने उच्चारला जातो. व्रतवैकल्ये, सणवार, पारंपरिक वेशभूषा हे सर्व करणे म्हणजेच संस्कृतीची जोपासणा करणे हा अनेकांचा गैरसमज झालेला आहे. ज्याला आपण ‘आपली संस्कृती’ म्हणत कवटाळत असतो, ती मूळात पूर्णपणे आपली आहे का ? पिढ्यान्पिढ्यांपासून जशीच्या तशीच ती आपल्यापर्यंत पोहचली आहे का ? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.
संस्कृती ही प्रवाही असते. स्थलांतर, पर्यटन, या व अशा कारणांमुळे माणसासोबत होणारा संस्कृतीचा प्रवास, संकर होऊन त्यातूनच नवीन संस्कृती उदयाला येणे, हे चक्र शाश्वत आहे.
साहित्य, कला, संगीत, वस्त्र, पाककला, इ. विविध अंगांनी संस्कृती समृद्ध होत असते, तसेच अनेक संस्कृतींशी समन्वय आणि संकरही घडून येत असतो, ती प्रक्रिया आणि त्यातील सौंदर्य हेच या लेखांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवायचे आहे.
सोबतच कथा, कविता आणि ललीत लेखही आहेत.
उत्सवाचे दिवस आहेत पण सगळीकडे पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यात आणि देशात ठिकठिकाणी बळीराजा संकटात सापडला आहे. सणासुदीचा आनंद फक्त स्वतः पुरता न ठेवता पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येऊयात. आतातरी ‘बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना करूयात.
या अंकाच्या निर्मितीसाठी मदत आणि मार्गदर्शन करणारे ‘शब्दालय’ परिवारातील आप्त, अंकातील सर्व लेखक, कवी, चित्रकार, जाहिरातदार, अक्षर – जुळणीकार, मुद्रीत शोधक, आणि सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.
दिवाळी आणि नवीन वर्षाच्या स्नेहमय शुभेच्छा !
– मृण्मयी पाटील – लांडे
Reviews
There are no reviews yet.