Description
वक्तृत्वोत्तेजक स्पर्धा हा शाळा- कॉलेजेसमधून होणारा एक वार्षिक उपक्रम आहे. त्या उपक्रमांसाठी स्पर्धकांना तयारी करावी लागते. त्या तयारीसाठी स्पर्धकांना लागणारे मार्गदर्शन करण्याचा हा एक चांगला. प्रयत्न डॉ. भगवान सावंत यांनी त्यांच्या ‘शब्दसंपदा’ या पुस्तकाच्या रूपानं केला आहे. स्पर्धेला उभं राहण्यापासून तर पेहराव कसा असावा याचंही मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. तसंच निरनिराळ्या विषयांवरची भाषणंही या पुस्तकात त्यांनी समाविष्ट केली आहेत, जी स्पर्धकांना अधिक उपयुक्त व मार्गदर्शकपर ठरतील. एक ‘ स्तुत्य उपक्रम’ असंच या पुस्तकाचं वर्णन करता येईल.