Availability: In Stock

Shaileemeemansa | शैलीमीमांसा

325.00

ISBN: 9788194460022

Publication Date: 1/7/2001

Pages: 182

Language: Marathi

Description

शैलीमीमांसा या ग्रंथाची मांडणी ‘सिध्दान्त आणि उ प य T अशी’ अशी दोन भागांत केली आहे. सैध्दान्तिक विचार मांडतांना डॉ. दिलीप धोंडगे यांनी प्रस्तुत विषयाच्या आजवरच्या अभ्यासाचे चिकित्सक परिदर्शन घडवले आहे; परिणामतः त्याला अद्ययावतता आली आहे. आणि मुख्य म्हणजे सैध्दान्तिक विचाराच्या प्रतिपादनार्थ मराठी काव्याची उदाहरणे पुरविल्यामुळे विचाराचे वैश्विक स्वरूप स्पष्ट झाले आहे.

उपयोजन या भागात काव्य, कथा आणि कादंबरी यांची विश्लेषणे सादर केली आहेत. काव्यांत श्रीज्ञानदेव ते अरुण कोलटकर यांचे काव्य असा मोठा पट कवेत घेतला आहे. कथा- कादंबरीचा विचार करताना अनायास दुर्लक्षित विषयांकडे लक्ष पुरविले गेले आहे.

शैलीमीमांसा करतांना डॉ. धोंडगे यांचे ओल्या मुळासारखे मन समीक्षा व्यवहाराच्या कठीण खडकालाही कसे सहज भेदते, याचे रम्य दर्शन प्रस्तुत पुस्तकात सर्वत्र घडते. एका आधुनिक विषयावर स्वतंत्र ग्रंथ सिध्द करून डॉ. धोंडगे यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने दमदार पाऊल टाकले आहे, याचा कोणाही अभ्यासकाला मनःपूर्वक आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.