Description
विनायाक हिरवे (पारनेरकर) यांनी लिहिलेला ‘सूर्य गेला नाही अजून अस्ताला ‘ हा काव्यसंग्रह मिळाला. विविध सामाजिक विषयावर लिहिलेल्या कविता या पुस्तकातून वाचायला मिळतात. महाराष्ट्रीयन जनतेचे भाग्य आहे की, मराठी साहित्य क्षेत्र संपन्न आहे. सामाजिक भान असलेल्या तरुणांच्या लेखणीतून मराठी साहित्य अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न होतोय. विनायक हिरवे हे त्यापैकी एक. त्यांनी आपल्या अवतीभवतीच्या निरिक्षणातून जाणवलेल्या विविध पैलूंना या पुस्तकातील कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. स्वतःसाठी जगत असताना आपले गाव, आपला समाज व आपली माणसं यांच्यासाठी काहीतरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मार्ग वेगवेगळे असतील पण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे. हे काम सहित्यातूनही प्रभावीपणे होऊ शकते. ‘सूर्य गेला नाही अजून अस्ताला’ हा काव्यसंग्रह त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरेल असे वाटते. विविध विषयांवर वास्तवाचे भान ठेऊन निर्भिड भाष्य करण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. म्हणूनच या कविता वाचकांना नवी दृष्टी देतील असे वाटते. या कविता संग्रहाच्या रूपाने आपली साहित्यसेवा समाजाप्रति अर्पण करण्याची कवीची धडपड निश्चितपणे स्तुत्य आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तसेच त्यांच्या लेखन कार्यास आणि भावी जीवनास हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद !