Description
फ्रेया एक प्रामाणिक मुलगी! तरुण वयात तिनं स्वप्न पाहिली- गरीब मायकेल बरोबर ! मोठ्या फर्ममध्ये अकौंटट असलेले तिचे वडिल पैशाच्या अफरातफरीत अडकतात. त्यांचा साहेब जतीन विश्वदीप, ज्याची पत्नी निवर्तली आहे. फ्रेयाच्या निसर्गदत्त गुणांमुळे व सौंदर्यामुळे जतीन फ्रेयावर लुब्ध होतो व तिला लग्नाची मागणी घालतो. वडिलांच्या बचावाखातर ती ही ‘तडजोड’ स्वीकारते..हे दोघांचा संसार सुरू होतो. बद्धिमान व कलाउपासक असलेले • युगुल एकमेकांच्या प्रेमात पडू लागते न लागते तोच जतीनच्या पूर्व आयुष्यात असलेली ‘सुची’ त्यांच्या संसारात गैरसमजाचे बीज पेरते. त्या बिजाला अनिष्ट घटनांचे पोषण मिळते व हाहा म्हणता दोघांमध्ये गैरसमजांचा प्रचंड वृक्ष तयार होतो. या अवधीत ‘अमालचा’ जन्म होतो. परंतु अमालला रुबीच्या हातात सोपवून फ्रेया जतीनच्या जीवनातून निघून जाण्याचा निर्णय घेते. फ्रेयाची सूचीशी झालेली भेट जतीनला माहीत नसल्यामुळे जतीन फ्रेयाच्या निघून जाण्याचा वेगळा अर्थ घेतो. दोघे विरहात झुरत राहतात. शेवटी ‘साय’ जतीनचा व फ्रेयाच्या मित्र, दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. तो त्यात यशस्वी होतो का ?