Description
राजकारण, समाजकारण, व्यवसाय, कुटुंब अशा विविध क्षेत्रातील अनेकविध भूमिका केंद्रस्थानी राहून पार पाडताना संपर्कात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती विशेषतः स्त्रिया, त्यांच्या आयुष्याचं घडणं, बिघडणं, कधी उसळी घेऊन उभं राहणं, तर कधी मोडून पडणं या साऱ्यांचं चित्रण श्रीमती उषाताई दराडे अतिशय संवेदनशीलपणे करतात. हळुवार कवितांच्या ओळींबरोबर अनेक स्त्रियांच्या आयुष्याच्या तारा ताई सहजपणे छेडून जातात. त्या स्त्रियांचं भावविश्व सूरांच्या लकेरींसारखं आपल्या हृदयाचा ताबा घेतं आणि त्यांच्या वेदनेचा सल आपल्या काळजात उमटतो.