Description
या संग्रहात मराठीतील दहा स्त्रीवादी कथांचा समावेश आहे. स्त्रीवाद ही ज्ञानशाखा आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा म्हणून आज जगभरात मान्यता प्राप्त आहे. जगातल्या बहुसंख्य विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या अंतर्गत स्त्रीवादी सिद्धांतनाचा समावेश झालेला आहे. स्त्रीवाद हा केवळ एक प्रवाह नाही तर अर्ध्या जगाविषयी आणि त्यांच्या प्रश्नांविषयीची मांडणी या ज्ञानशाखेत केली जाते. हे जग स्त्रियांचे जग आहे. ते जग पुरुषसत्ताक व्यवस्थेचे बळी आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांवर लादलेल्या गुलामीचे विश्लेषण करताना पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या अंतर्गत निर्माण झालेल्या संकल्पनांची चिकित्सा स्त्रीवादाला करावी लागते. पुरुषी वर्चस्ववादी दृष्टिकोनामुळे प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना नाकारलेपणाचा अनुभव येतो या नाकारलेपणाची चिकित्सा स्त्रीवादात केली जाते. मानव्यविद्याशाखा, साहित्य, संस्कृती, इतिहास, पर्यावरण एवढेच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्या अभ्यासशाखांमध्ये स्त्रीवादी सिद्धांताच्या आधारे स्त्रियांच्या गुलामगिरीचे विश्लेषण करून पुरुषसत्ताकतेमुळे आलेला एकांगीपणा स्पष्ट केला जातो.