Description

उदय प्रकाश जन्म १९५२, मध्यप्रदेशातल्या शहडोल जिल्ह्यातील सीतापूर गावात. विज्ञानाचे पदवीधर. हिंदी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण. अध्यापन व पत्रकारिता या क्षेत्रांत दीर्घकाळ काम. इंडिपेन्डन्ट टेलिव्हिजन तसंच पी.टी.आय. (टेलिव्हिजन) साठी काही काळ पटकथा प्रमुख. सध्या स्वतंत्र लेखन, पत्रकारिता आणि फिल्म निर्मितीत व्यग्र. साहित्य अकादमीसाठी धर्मवीर भारतींवर फिल्मची निर्मिती. सध्या वास्तव्य दिल्लीत. दरियाई घोडा (१९८२), तिरिछ (१९९०), और अंत में प्रार्थना (१९९६) आणि पॉल गोमरा का स्कूटर (१९९७) हे चार बहुचर्चित कथासंग्रह. सुनो कारीगर (१९८०), अबूतर कबूतर (१९८४) आणि रात में हार्मोनियम (१९९८) हे तीन कवितासंग्रह. ईश्वर की आंख (१९९९) हा निबंधांचा आणि समीक्षात्मक लेखांचा संग्रह.

अमृतसर: इंदिरा गांधी की आखिरी लडाई (मार्क टली सतीश जेकब ), रोम्यां रोला की डायरी: भारत, आणि लाल घास पर नीले घोडे (मिखाइल शात्रॉव्हचे नाटक) आदी काही अनुवाद.

उदय प्रकाशांच्या कृतींचे मराठी, उर्दू, कन्नड, गुजराती, उडिया आदी अनेक भारतीय भाषांतून तसंच रशियन, इंग्रजी, जर्मन व स्पॅनिश आदी विदेशी भाषांतून अनुवाद झालेत. भारतभूषण अग्रवाल पुरस्कार (१९८०), ओमप्रकाश साहित्य सन्मान (१९८२), : श्रीकांत वर्मा स्मृति पुरस्कार (१९८९), गजानन माधव मुक्तिबोध पुरस्कार (१९९४) आणि सदभावना पुरस्कार (१९९७) अशा पुरस्कारांनी सन्मानित.

Additional information

book-author

Book Translator

Jayprakash Sawant | जयप्रकाश सावंत