Description
भूतकाळ कितीही मागे टाकायचा म्हटलं, तरी त्याच्या मुशीतच बर्तमानाला आकार येत असतो. भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते आपल्याला जरी भान असलं नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत-आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते.कधीतरी प्रसंगाप्रसंगाने ही जाणीव आपल्या मनाच्या क्षितिजावर उगवत जाते- पहाटेतून सकाळ उजळावी, तशी ; आणि मग सर्वच जगत तेजाळून जाते- एका नव्या, प्रसन्न प्रकाशाने. एकच स्वर अज्ञातातून घुसत राहतो, घुमत राहतो : ‘हे असंच होत आलंय्, पुन्हा पुन्हा हे असंच होत आलंय्.’हीच भूतकाळाची गडद काळी सावली प्राध्यापक भांगऱ्यांसारख्या, वरवर पाहता, एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाला काजळून टाकणं शक्य होतं; पण अनुभवांतून आलेल्या एका शांत, सोशीक शहाणपणानं ते या भूतकाळाच्या सावलीतून मुक्त झाले, आणि एक नवा आश्वासक वर्तमान जन्माला आला.