Description
महात्मा जोतीराव फुले यांनी ‘तृतीय रत्न’ नावाचे नाटक लिहून ते १८५५ साली दक्षिणा प्राइझ कमिटीकडे पुरस्कारासाठी पाठवले; पण समितीने हस्तलिखित नापसंत केले. जवळजवळ सव्वाशे वर्षांचा काळ उलटल्यानंतर प्रा. सीताराम रायकर यांनी ‘पुरोगामी सत्यशोधक’ त्रैमासिकाच्या एप्रिल – जून १९७९ च्या अंकात नाटकाची संहिता प्रकाशित केली.
जोतीरावांनी लिहिलेले हे एकच नाटक मराठीतील पहिले स्वतंत्र सामाजिक नाटक म्हणून महत्त्वाचे ठरते. त्याला केवळ संवादात्मक निबंध म्हणणे अन्यायकारक होईल. आजच्या विकसित मराठी नाटकाचे आरंभबिंदू या नाटकात समुच्चयाने कसे एकत्रित आले आहेत ते स्वतः नाटककार असलेल्या प्रा. दत्ता भगत यांनी त्यांच्या या समीक्षापर पुस्तकात दाखवले आहे.