Description
मागं वळून पाहतोय तर खंत वाटतेय । सरळ, पुढे पहातोय तर अंत आहेच.अभिनेता शरीरयष्टीने उत्तम आणि बुद्धीने तत्त्ववेत्ता असावा असं ॲरिस्टॉटल म्हणाला होता. याच्या सोबतीनं अभिनेता मनाने उत्कट संवेदनशील असावा हीही एक बाब पूर्वअट म्हणून विचारात घेतली पाहिजे. सयाजीमधल्या उत्कटतेचा आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय त्याच्या नाटक / सिनेमांमधल्या अभिनयातून आपल्याला वारंवार येतच असतो. त्याचंच अगदी अनपेक्षित सुंदर आणि अनोखं रूप या लेखनात आपल्याला दिसतं. सोबतीनं हाच ‘तुंबारा’ त्याच्या स्वतःच्या आवाजा ऐकताना जो थरार अनुभवाला येतो, त्याला खरोखरीच तोड नाही. अंगभूत रसरशीत अनघडतेला स्वतःच्या आंतरिक इच्छेच्या एकमात्र बळावर बव्हंशी स्वतः आकार दिलेल्या या माणसाच्या मनाची अनिर्बंध उत्कट स्पंदने आणि त्यांनी धारण केलेला स्वाभाविक आकार म्हणजे, हा तुंबारा.





