Description
वैचारिक गद्य या संग्रहामध्ये सामाजिक सांस्कृतिक, भाषाविषयक, स्त्री जीवन आणि जाणिवाविषयक, पर्यावरण, शेतकरीजीवन, अस्पृश्यता, सद्यस्थितीतील काही प्रश्न, विषय, विचार या विषयांवरील लेखन समाविष्ट केलेले आहे. हे लेखन विद्या वर्गात काही जाणिवा निर्माण करू शकेल. हे लेखन विविध काळातील लेखकांचे अप तरी तत्कालीन समस्या, जीवन, विषय व विचार यावर ते नेमके बोट ठेवते. या सर्वच लेखांमधील चिंतनशीलता हा गद्य वाङ्मयाचा एक विशेष अधोरेखित करते गए वाङ्मयात चिंतनशीलतेला महत्त्वाचे स्थान असते. कोणताही विचार समाजापर्यंत पोहचवायचा असेल तर गद्यासारखे दुसरे माध्यम नाही. गद्यातील विचार सर्वच वाचकांच्या हृदयापर्यंत सहज पोहचतात. या लेखसंग्रहातील सर्वच लेखन हे तळमळीतून झालेले आहे. याचा प्रत्यय या संग्रहातून वाचकांना येईल.
प्रस्तुत लेखसंग्रहात काही निवडक लेखांचाच समावेश झालेला आहे. अभ्यासासाठी वसाहतवादी राजवटीतून आलेल्या जाणिवेपासून जागतिकीकरणाने आलेल्या विविध समस्यापर्यंतच्या विविध विषयांचा उहापोह केलेला आहे. हे संपादन वाचकांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.