Description
डॉ. सुनंदा रेवसे यांच्या समीक्षा साधनेचा प्रवास खडतर आहे. अनेक अडथळ्यांवर मात करीत स्वतःला सिद्ध करण्याचे परिश्रम लेखिकेने घेतले आहेत. यात क्षणोक्षणी जिवंत शब्दांचे स्पर्श जाणवतात. शब्दांचा चिवटपणा व मूळ तत्त्वाशी सुसंगत असा भावार्थ उलगडत जातो. जे सत्य आहे, सामाजिक सुखाचे आहे, निष्पाप व निरागस आहे ते सर्व कुशलतेने आणि सहजपणे हाताळणाऱ्या डॉ. सुनंदा रेवसे यांना ‘वाङ्मयीन प्रवाह : एक समीक्षा’ हा ग्रंथ सर्वच अभ्यासकांना नितांत उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. शब्दांनी हुरळून जाणारे, अज्ञानीपण आणि कौतुकाच्या थापांनी डोक्यात अहंकाराच्या राशी उभारणारे खुजेपण या पलिकडे लेखिकेची निकोप, तटस्थ आणि पारदर्शी दृष्टी आहे.