Description
‘योग’ हा संस्कार म्हणून बालपणात जर प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना दिला तर चपळ, लवचिक व उर्जावान शरीर असणारे तरूण या देशाला लाभतील. लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह या सारख्या आजारांना दूर ठेवणारा योगाचा ‘संस्कार’ हा ‘लहान मुलांमध्ये’ ‘खेळ’ म्हणून रुजवल्यास त्याचे ‘छंदात रुपांतर होईल. हा छंद खेळ म्हणून जोपासल्यास मुले त्यात पारंगत होऊन बक्षिसे मिळवतील व त्याची साधना केल्यास निरोगी, बलवान शरीर व तणावरहित, आनंदी चैतन्ययुक्त ‘मन’ हे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात अशा मुलांना, बालकांना यशस्वी होण्यास सतत मदत करत राहील. या पुस्तकाचा हेतुच मुळात योगाला ‘संस्कार’ म्हणून रूजवण्यासाठी, खेळ म्हणून जोपासण्यासाठी व ‘छंद’ म्हणून वृध्दिंगत करत योगाची अखंड साधना करणे हा आहे.