Description
‘वाघूर’ दिवाळी अंकाचे हे नववे वर्ष. यंदाचा अंक ‘चहा’ या विषयावर केंद्रित आहे. चहा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. पाण्यानंतर सर्वाधिक प्रमाणात प्यायले जाणारे हे लोकप्रिय पेय आहे. चहाला तसा फार प्राचीन इतिहास नाही. अवघ्या पाच-सात दशकांतच भारतातल्या घराघरात पोहचलेल्या चहा पेयाला अल्पावधीत समाजमान्यता मिळाली. मानपान-आदर-आतिथ्य म्हणजे चहा; अशी चहाची ओळख आहे. चहा संवादाचं माध्यम आहे. सुख दुःखाची देवघेव चहातून होते. प्रत्येक चहामागे एक गोष्ट असते. याच उबदार चहाच्या खुमासदार आठवणी व कवितांनी यंदाचा वाघूर ‘चहा विशेषांक’ सजला आहे.