Availability: In Stock

Tikli Tar Tikli | टिकली तर टिकली

150.00

Publication Date: 01/05/2007

Pages: 144

Language: Marathi

Description

मराठवाड्यातील छोट्याशा गावातली मुलगी स्वबळावर महानगरात येऊन स्वत:ची जागा निर्माण करते, हा तिचा प्रवास! कामानिमित्त केलेला प्रवास आणि ठिकठिकाणी तिला भेटलेली माणसे! माणसे आणि त्यांचे नातेसंबंध यात तिला विलक्षण रस आहे.माणसांकडे ती तन्मयतेने तरीही तटस्थतेने बघत असते. घटनांची वर्णने साधी, सरळ व धारावाही असतात. मात्र घटनांनंतर येणारे भाष्य अंतर्मुख करायला लावणारे आहे.माणसे कशीही असली तरीत्यांच्यातले चांगुलपण अधोरेखित करण्याकडे तिचा कल आहे. यातली अनेक माणसे तुम्हाआम्हाला भेटलेली, ओळखीची वाटतात. पण त्यांचे वेगळेपण मात्र लेखिकेने अचूक टिपलेले आहे. प्रशासनात राहूनही तिने आपली संवेदनशीलता जाणीवपूर्वक जपली आहे.लेखिका महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये संचालक आहेत.