Description
कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा एकात कवीच्या अखेरच्या काळातल्या आठवणी त्याच्या प्रेयसीने लिहिलेल्या. तर दुसरी एक श्रेष्ठ लघुकादंबरी. या शतकातल्या जागतिक महत्त्वाच्या लेखकाने लिहिलेली. कवी रशियन ब्लादिमीर मायकोवस्की (१९९३-१९३०) प्रेयसी व्हेरोनिका पोलोन्स्काया. अतिशय निर्लेप साधेपणाने व थेटपणे मांडलेल्या या आठवणी. लघुकादंबरीचा लेखक कोलंबिया – लॅटिन अमेरिका येथे जन्मलेला. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (जन्म: १९२८), १९८२ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेला. मूळ लेखन अनुक्रमे रशियन व स्पॅनिश भाषेत आहे. त्यांच्या इंग्रजी अनुवादावरून मराठी अनुवाद रंगनाथ पठारे यांनी केला आहे. चांगले काही वाचल्याचा आनंद आपल्या भाषेतील वाचकांना वाटणे ही त्यामागची भूमिका आहे.