Description
” साक्षतरता ह्या शब्दातच एक मूल्यभाव आहे. त्याचा संबंध केवळ वचन आणि लेखनाशी नाही, तो काळजाशी आणि आतड्याशी आहे”, हे मूल्यविधान म्हणजेच निशाणी डावा अंगठा ही कादंबरी. मनस्वीपणे सर्जक कृती करण्यातून जीवनाला अर्थ प्राप्त होणार आहे. ही क्रियानिष्ठा निर्माण करण्याची क्षमता या कादंबरीत आहे. अशा साहित्यकृतीचे आकलन, विश्लेषण व अर्थनिर्णयन करून घेणे वाङ्मयीन संस्कृतीची जबाबदारी आहे. या प्रक्रियेला अधिक गती येत राहणार, ही खात्री येथे नोंदवावीशी वाटते. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही आपण ज्ञानाचा विचार करीत आहोत, साक्षरताप्रचार आणि निरक्षरताप्रसार एकाच वेळी करीत आहोत. ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती प्रक्रियेतील हे प्रसंगनाट्य आपल्या कल्पकसंज्ञेच्या बळावर आपल्याला सोसायचे आहे. वास्तवाचे अपेक्षित वास्तवात रूपांतर घडवून आणण्यासाठी निशाणी डावा अंगठा या सारख्या साहित्यकृतींची निर्मिती आणि चिकित्सा सुद्धा आपली बाध्यता- जबाबदारी आहे….