Availability: In Stock

Khanolkaranchi Natyasrushti | खानोलकरांची नाट्यसृष्टी

320.00

Publication Date: 12/1/2003

Pages: 338

Language: Marathi

Description

मराठी नाट्यसृष्टीच्या आधुनिक कालखंडातील एक ‘प्रतिभावंत नाटककार’ म्हणून गौरविले गेलेले चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे एक लक्षणीय वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व होते. मराठी साहित्यातील ‘साठोत्तरी’ काळाचे ते संकल्पक आणि संवर्धक म्हणूनही विख्यात होते. कथाकार, कादंबरीकार, कवी आणि नाटककार या नात्यांनी त्यांनी जी साहित्यनिर्मिती केली, तिने मराठी साहित्याला नवसंवेदनशीलता, नवदृष्टी आणि नवीन कलात्मकता बहाल केली.

चिं. त्र्यं. खानोलकर यांनी साकारलेल्या आणि मराठी रंगभूमीवर प्रयोगांकित झालेल्या त्यांच्या सात नाटकांची सर्वांगलक्ष्यी आणि समग्र चिकित्सा ‘खानोलकरांची नाट्यसृष्टी’ या प्रस्तुत ग्रंथात प्रा.डॉ.पुष्पलता राजापुरे- तापस यांनी केली आहे.

“मानवी जीवनातील एकाकीपणाचे, सुख-दुःखाचे, यातना आणि भोगांचे वैविध्यपूर्ण खानोलकरांचे नाटक म्हणजे ‘मानवी दुःखाचा शब्द’ असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मानवी दुःखाच्या यातनाकारी रूपाचे बहुमुखी दर्शन त्यांची नाटके घडवितात. खानोलकरांची नाट्यप्रतिभा परिचित आणि अपरिचित वाटांनी प्रवास करते आणि आपल्या विशिष्ट संवेदन-स्वभावाला अनुसरत मानवी दुःखाचा शोध घेते. ”