Availability: In Stock

Muke Jate Gane Gate | मुके जाते गाणे गाते

90.00

Publication Date: 15/07/2007

Pages: 94

Language: Marathi

Description

प्रा. विनायक बंगाळ यांचा हा ग्रंथ म्हणजे मौखिक परंपरेने चालत आलेल्या आणि आईने सांगितलेल्या ( जात्यावरील) ओव्यांचा आस्वादात्मक रसास्वाद आहे. आपल्या अशिक्षित आईच्या मुखातलं अक्षरलेणं शब्दबध्द करून लेखक आपला साहित्यिक वारसा कृतज्ञतेने जपतो आहे. जात्यावरची ओवी ही अस्सल मराठमोळी ! मराठीच्या आदिबंधातून निर्माण झालेली ! ती जितकी प्राचीन तितकी विविधतेने नटलेली आहे. याचा प्रत्यय ह्या ग्रंथातूनही येतो. या ग्रंथातील ओव्यात जात्याला ईश्वर मानून केलेले पूजन आहे.. स्थानिक देव-देवता, सर्वमान्य देव-देवता, परिसर वर्णन, शेतीवाडी, पाऊस- पाणी, सण-समारंभ, लग्न, सासर-माहेर, मुलंबाळं, यांच्यासहीत एकूणच सारा गोतावळा आहे. संसार – प्रपंचात जे जे म्हणून असते ते ते सर्व काही आहे. त्याची गंमत वाचण्यातच आहे. ‘आत्मपर’ या विभागातील ओव्या वाचताना आपण अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही. लोकसंस्कृतीची गरज, श्रमपरिहार, आत्माविष्कार, मनोरंजन व आनंदनिर्मिती इत्यादी प्रेरणांतून ओवीची निर्मिती झाली आहे. सर्व जाती- धर्मातल्या मराठमोळ्या स्त्रियांनी तिला कडेखांद्यावर घेऊन मोठी केली आहे. आजही तिच्यातून संपूर्ण मराठी स्त्री-मनाचा आत्माविष्कार होताना दिसतो. या ग्रंथातील सासुरवाशीण ही त्याच पठडीतील आहे. तिचे अवघे भावविश्व आणि विचारविश्व या ग्रंथातल्या एकशे त्रेचाळीस ओव्यांतून उमलले आहे.