Availability: In Stock

Kubra (Eka Shushka Panzadi Jangalatyala Nondi) | कुब्र (एका शुष्क पानझडी जंगलातल्या नोंदी)

230.00

Isbn-9788195979226

Publication Date -20/12/22

Pages-120

Language-Marathi

Description

उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने एकविसाव्या वर्धापनदिनामित्त नागनाथ कोत्तापल्ले सूर्योदय साहित्य पुरस्कार या पुस्तकास मिळाला आहे. ‘कुब्र’ हे सत्यजीत पाटील यांनी केलेले अरण्यवाचन आहे. अरण्याची लिपी ही सूक्ष्म तरंगांची असते. लेखकाने अतिशय समरसतेने ताडोबा अरण्यात एका प्रकल्पादरम्यान आपल्या वास्तव्यात ती उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अरण्य म्हणजे केवळ झाडे नव्हेत. झाड म्हणजे केवळ बुंधा, पाने, फुले नव्हेत. एका झाडात पूर्ण अरण्य सामावलेले असते आणि समग्र अरण्यात कोट्यवधी जीवांचे जगणे सामावलेले असते. अरण्य म्हणजे अगणित जीवांची सृष्टी, त्यांचे अंतहीन विश्व. हे जीव एकमेकांशी जोडलेले असतात. एक जैविक साखळी असते. त्यातला एखादा दुवा जरी निसटला तरी त्याचे दुष्परिणाम साऱ्या सृष्टीला भोगावे लागतात.

या पुस्तकात लेखकाने अरण्याच्या आतल्या भागात श्वापदांचे, जनावरांचे, कीटकांचे जगणे वागणे कसे असते ते सांगितलेले आहे. येथे नवसर्जन असते तसाच संहारही असतो. जन्म असतो, मृत्यू तर पावलोपावली असतो. परंतु कोणतेही जनावर जगण्याच्या अनिवार्य कारणासाठी हिंसा करते. निष्कारण हत्या करीत नाही. मरून गेलेला प्राणीदेखील नवीन जीवांच्या उत्पत्तीला सहायक होतो. या भटकंतीत लेखकाला अनोखे अनुभव आले. ते किटकापासून मोठ्या प्राण्यांच्या अनुभवापर्यंत विस्तारित असलेले आणि थरारून टाकणारे आहेत. वाघ, बिबट, तरस, रानकुत्री विविध तृणभक्षी, मगर, अजगर, फुलपाखरे, मुंग्या असे निरीक्षणविषय आलेत पुस्तकात. त्याचबरोबर अरण्याबाबत मानवी वर्तन कसे आहे याची ही लेखकाने चिकित्सा केली आहे. मानवाचे या कुब्र किंवा निबीड अरण्यावरचे आक्रमण हे अंतिमतः मानवाचाच विनाश करणारे कसे आहे हे येथे दाखवून दिले आहे.

अरण्यात अनुभवलेल्या ऋतूंचा हा प्रवास एक संचित देऊन जातो. ‘कुब्र’ हे एक अरण्यविषयक, पर्यावरणविषयक, जैविकशृंखला विषयक पुस्तक असूनही त्याची भाषा ही चित्रदर्शी, प्रवाही काव्यात्म आहे. चिंतनात्मक आहे.

Additional information

Book Author