Description
नेवरीच्या फुलांचा सडा पडायला बहुधा सांजसमयीच सुरवात होते. आपला शृंगार कोणी बघू नये म्हणूनच हा संध्या समय नेवरीने पसंत केला असावा. पहाटेच्या आगमनासाठी, स्वागताचे तबक घेऊन नेवरीचे झाड उभे राहाते. पहाटे पासून दिवसभराचा प्रवास तसाच कोवळा निर्व्याज राहावा अशीच जणू नेवरीची प्रार्थना असते. तेव्हा त्या शब्दांशी निरंतर संवाद सुरू होतो आणि पैंजणांचे झाड रुमछुमत राहाते.