Description
कोणत्याही अनुभवाचा स्वभाव असतो तो अभिव्यक्त होताना आपल्या मूलभूत गुणधर्माप्रमाणं आकार घेतो. रचनेचे अनुबंध घडवतो. कधी हे अनुबंध स्वाभाविकपणे अवतरतात, तर कधी कलावंत अनुभवाने तर्काला दूर सारून, अनुभवांना वाकवून एकपिंडात्मक अनुभव देत असतो. महावीर जोंधळे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य ते आहे. एकच वाङ्मय प्रकार स्वीकारला तर त्यात विविध प्रकारचे रचनाबंध सामावणे शक्य होते. हे ललितगद्य अनेक पातळ्यावर वावरताना दिसते