Description

डॉ. सुधीर राजाराम देवरे यांना आपण साहित्यिक, समीक्षक, लोकसंस्कृतीचे व भाषेचे संशोधक म्हणून ओळखतो. त्यांचे “पंख गळून गेले तरी।” हे पुस्तक मात्र वेगळ्याच आशयाचे आहे… आत्मकथन. हे आत्मकथन संक्षिप्त स्वरूपात २००७साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती. पहिल्या आवृत्तीत जे कथन संपृक्त व संदिग्ध जाणवत होते तो आशय दुसऱ्या आवृत्तीत स्पष्ट होत जातो.

नव्या आवृत्तीच्या निमित्ताने मजकुराचा विस्तारही करण्यात आला. या आत्मकथनात केवळ नकारात्मक घटनांचाच पाढा वाचलेला नाही. मानवी आयुष्याच्या चिंतनासोबतच अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींबद्दल हृदयस्थ कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. माणसाच्या परतत्वस्पर्शी चांगुलपणाचा सखोल शोधही या आत्मकथनात उदृत झालेला दिसेल. डॉ. देवरे चिंतनातून सुसंस्कृत अशा मानवी समाजाचा शोध घेताना दिसतात.

हे पुस्तक केवळ अपंगांनाच नव्हे, तर विद्यार्थ्यांसह सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल…

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pankha Galun Gele Tari… | पंख गळून गेले तरी…”

Your email address will not be published. Required fields are marked *