Description

सचिन कुंडलकर हे नाव नाट्यक्षेत्राला अधिक जवळचं. ‘छोट्याशा सुट्टीत’ या प्रायोगिक नाट्यलेखनाने त्यांच्यातल्या संवेदनक्षम लेखकाकडे लक्ष वेधलं गेलं.

कादंबरीच्या क्षेत्रात ‘कोबाल्ट ब्लू’द्वारे त्यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल.

स्त्री आणि पुरुष या नातेसंबंधांचा एका वेगळ्या दृष्टीतून न्याहाळलेला कोन आणि समांतरपणे एका अनोळखी नात्याचं अमूर्तरूप पकडण्याचा प्रयास-हे या कादंबरीचं सूत्र.

आजच्या काळाचं आणि आजच्या तरुण पिढीच्या आधुनिक विचारांचं जगणं आस्वादण्याच्या उल्हसित वृत्तीचं आणि त्याच उत्कटपणे सुख-वेदनांनाही कवटाळण्याचं एक प्रतिबिंब न्याहाळता येईल अशी ही कादंबरी.

पारदर्शक व्यक्तिरेखा आणि तरुणाईच्या सळसळत्या, जिवंत भाषेचा सहज आविष्कार हे ‘कोबाल्ट ब्लू’चे ठळक विशेष.

नाटकाप्रमाणेच कादंबरीक्षेत्रातील सचिन कुंडलकरांचा हा पहिला प्रयत्न म्हणूनच आश्वासक ठरणारा.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kobalt Blue | कोबाल्ट ब्लू”

Your email address will not be published. Required fields are marked *