Description

डॉ. सुधीर राजाराम देवरे हे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे संशोधक आहेत. आतापर्यंत त्यांचे विविध विषयांवरील सदतीस पुस्तके प्रकाशित झाले असून काही पुस्तके अप्रकाशित स्वरूपात लिहून पूर्ण झाली आहेत.

‘आयता धनवरला नागोबा’ हा अहिराणी भाषेतला कथासंग्रह म्हणजे सुधीर देवरे यांनी युवकावस्थेत असताना लिहून ठेवलेल्या कथांमधून निवडून घेतलेल्या २० कथा. आपल्या परिबेशातल्या स्वानुभवातून विशिष्ट वयात लिहिलेल्या ह्या कथा आहेत. लेखकाने आजूबाजूला राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवांचे आणि ग्रामीण भागाचे दाहक बास्तव कलात्मकतेने चित्रित केले आहे. मूळ अहिराणी भाषेतल्या या कथा वाचताना मराठी वाचकाला कुठेही भाषिक अडचण येत नाही ही जमेची बाजू. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीतून ह्या कथा आविष्कृत झाल्या आहेत.

अहिराणी, मराठी अथवा कोणत्याही बोलीभाषकाला या कथा निखळ साहित्याचा वाचनानंद देतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aayata Dhanvarla Nagoba | आयता धनवरला नागोबा”

Your email address will not be published. Required fields are marked *