Description
माणूस हा एक अगम्य प्राणी आहे. त्याचं मुख्य कारण केवळ त्याच्याच ठायी असलेल्या भावविश्वात दडलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू तर त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. त्यांच्या प्रभावाखाली माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीत, अनेक रचनाबंध आणि रंग यांचा विचित्र गोफच विणला जातो. माणसाच्या-खरंतर सर्वच सजीवांच्या-शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्माचं सुकाणू त्यांच्या ठायी असलेल्या जनुकांमध्ये दडलेलं असल्याचे पुरावे गेल्या काही वर्षांमध्ये वैज्ञानिकांनी मिळवलेले आहेत. त्यांचं नियंत्रण मेंदूमधील विविध आवर्तनांच्या माध्यमातून केलं जातं हेही स्पष्ट झालं आहे, त्यामुळेच माणसाच्या प्रसंगी विक्षिप्त वाटणाऱ्या वागणुकीची तर्कसंगत उपपत्ती लावण्यात, जनुकविज्ञान आणि चेताविज्ञान या दोन विद्याशाखांमधील संशोधनाने काही प्रमाणात तरी यश मिळवलेलं आहे. विज्ञानाची ही नवीन मुलूखगिरी चित्तचक्षु चमत्कारिकच आहे. त्याचीच ही साग्रसंगीत अशी ललितलेखरूपी ओळख.







Reviews
There are no reviews yet.