Description

श्याम मनोहर

प्रेम आणि खूप खूप नंतर

तरुण नरेंद्र आणि तरुण दीपिका प्रेमात पडतात. नरेंद्र दीपिकाच्या अनवट प्रेमाने मोहित असतो आणि त्याला मधूनमधून प्रेमात दीपिकाच व्हीलन वाटते. दोघांचे लग्र होते. “आपल्यासारखे मधुचंद्र सर्व तरुण-तरुणींचे व्हायला हवेत. आपण तरुण-तरुणींची मधुचंद्रासंदर्भात शिबिरे घ्यायला हवीत,” असे नरेंद्र म्हणतो. खूपखूप नंतर : तृप्त जीवन जगलेले नरेंद्रजी आणि दीपिकाजी… नरेंद्रजी आणि दीपिकाजी दूसरा मधुचंद्र साजरा करतात. परिस्थिती असे वळण घेते की नरेंद्रजी दीपिकाजींवर गोळी झाडतात…. तरुणपणापासून दीपिकाजी शोधत असतात. अखेरीस त्यांना ते सापडतेही.

श्यामची अशी ठाम धारणा आहे, की सद्यः कालीन व्यापक सामाजिक स्थितिप्रियतेच्या मुळाशी मध्यमवर्गाची बुद्धिविरोधी वृत्ती आहे. आमच्या समाजजीवनाला वैज्ञानिक पाया नाही. आम्हांला ज्ञानप्राप्तीची खरी ओढच नाही. माहितीच्या क्रांतीत मग्न असलेला आजचा समाज ज्ञानसमाजाच्या आदर्शापासून अधिकच दुरावत चालला आहे. आम्ही कोरडे विचार खूप गिरवले, तत्त्ववैचारिक उसनवारीही उदंड केली; पण ज्ञान संपादन करून सुधारणा किंवा चळवळी केल्या नाहीत….. श्यामच्या साहित्याचे पडसाद दीर्घ काळ उठत राहणे अटळ आहे. ज्याला कोणाला या समाजाचं, संस्कृतीचं आणि सभ्यतेचं गतिशास्त्र समजून घ्यायचं असेल त्याला, तसंच ज्या कोणाचं मानवी प्रश्नांच्या रेडिमेड उत्तरांनी समाधान होणार नसेल त्यालाही श्यामचं साहित्य नीट अभ्यासण्यावाचून गत्यंतरच नाही. त्याच्याइतका समकालीन आणि प्रत्यक्ष जगण्याच्या प्रक्रियेतून निवडलेल्या प्रसंगांद्वारे आपल्या लेखनातून तत्त्ववैचारिकतेचं ओतप्रोत माप बाचकांच्या पदरात घालणारा दुसरा लेखक आजतरी नाही.

– डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे

लोकसत्ता

नागपूर, १७ डिसेंबर २००४

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Prem Ani Khup Khup Nantar | प्रेम आणि खूप खूप नंतर”

Your email address will not be published. Required fields are marked *